Friday, 6 June 2025

Rani Ki Vav, Gujrat | रानी की वाव - Part 2

      मोढेरा सूर्य मंदिर प्रवास करून राणी की वाव साठी पुढे.... 

        मोठ्या उत्साहाने आमचा प्रवास सूर्योदयापूर्वीच सुरू झाला होता. सकाळी साधारण वाजता आम्ही मोढेराच्या सूर्यमंदिरात पोहोचलो होतोत्यानंतर मंदिराच्या बाहेरच एका छोट्याशा हॉटेलमध्ये गरमागरम नाश्ता केला आणि थोडंसं फ्रेश होऊन आम्ही साधारण १० वाजेपर्यंत मोढेरा सूर्यमंदिराचा आस्वाद घेऊन पुढील प्रवासासाठी तयार झालो. आता गंतव्य होतंराणी की वाव, पाटणजवळील एक अजोड वारसा स्थळ. मोढेरा ते राणी की वावचं अंतर साधारणपणे ५०-६० किमी असल्याने एक तासाचा प्रवास झाला. रस्ताही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत होता, आणि वाटेतल्या हिरवळींनी प्रवास सुखद केला.

        ११:१५ च्या सुमारास आम्ही राणी की वाव येथे पोहोचलो. तिथे तिकिट काढून आत प्रवेश केला आणि पहिल्याच नजरेत या अद्वितीय विहिरीच्या कलाकुसरीनं मंत्रमुग्ध झालो. खाली उतरता उतरता विहिरीतील शिल्पकला, विविध देवतांच्या मूर्ती, रचनेतील बारकावेहे सारं पाहताना एक काळाची सफर करत आहोत, असं वाटत होतं. ही विहीर केवळ पाणी साठवण्यासाठी नसून, एक संपूर्ण स्थापत्याचा नमुना आहे हे लगेच जाणवून गेलं. हे ठिकाण खरंच आपल्या इतिहासाची, संस्कृतीची साक्ष देणारं आहे. अशा वास्तू पाहून भारतातील प्राचीन वास्तुकलेचा अभिमान वाटतो.

२०१४ मध्ये युनेस्कोने राणी की वावला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. हा गौरव तिच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थापत्य दृष्टिकोनातून अत्यंत योग्य आहे. ही वाव केवळ जलसाठ्याची जागा नसून, एक कलात्मक देवालय वाटते.

        ही वाव .. ११व्या शतकात सोलंकी राजवंशाच्या भीमदेव प्रथम यांच्या स्मरणार्थ त्यांची राणी उदयमती यांनी बांधली. म्हणूनच तिला "राणी की वाव" असे म्हणतात. अनेक वर्ष ती सरस्वती नदीच्या पुरामुळे गाळात झाकून गेली होती, परंतु अलीकडेच तिला पुनरुत्थान मिळाले.

        ही वाव भूगर्भात सात मजल्यांपर्यंत खोल आहे. प्रत्येक पातळीवर सुंदर कमानी, मूर्तिकला, आणि कोरीव कामांनी सजवलेली आहे. पायऱ्या एका लयबद्ध रचनेत खालच्या भागाकडे नेतात, जिथे पाणी साठवलेले असते. सरस्वती नदी याच परिसरातून वाहत होती आणि त्यामुळेच येथे पाण्याची व्यवस्थाही सुरेख होती.

        राणी की वावमधील कोरीवकाम हे भारतीय स्थापत्यकलेचे एक जिवंत उदाहरण आहे. येथे विष्णूच्या विविध दशावतारांच्या, नृत्य करणाऱ्या अप्सरांच्या, देवी-देवतांच्या, आणि विविध दैनंदिन जीवनातील दृश्यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. त्या इतक्या बारकाईने कोरलेल्या आहेत की प्रत्येक मूर्ती जणू काही बोलते आहे असे वाटते.

        हे लक्षवेधी कोरीवकाम पाहताना सहज लक्षात येते की पाटणच्या प्रसिद्ध पाटोळा साड्यांवरील नक्षीकाम याच वावेतील कोरीवकामातून प्रेरणा घेतलेले असावे. दोघांमधील एकसंध कलात्मक शैली आणि बारकाव्यांची समानता खूप बोलकी आहे.

        राणी की वाव हा एक असा अनुभव आहे जो इतिहास, वास्तुशिल्प, जलव्यवस्थापन, आणि कलासंस्कृती यांचा संगम आहे. जो कोणी येथे जातो, तो या जागेच्या देखण्या सौंदर्यात हरवून जातोआणि मनात एकच विचार राहतोभारतीय वारसा किती समृद्ध आहे!

    अशा रीतीने राणी की वाव पाहून झाल्यावर आम्ही पूढील प्रवासासाठी सज्ज झालो... पूढील प्रवास अडालज नी वाव !

 

  

Top of Form

 

Bottom of Form

 

Top of Form

 

Bottom of Form

 


No comments:

Post a Comment