Thursday, 5 June 2025

लिटिल रण ऑफ कच्छ | कच्छ चे रण | LITTLE RANN OF KUTCH | RAMSAR Site | LRK

 


आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे असे सिंधमधील सर्वात मोठे रामसर स्थळ (RAMSAR Wetland) UNESCO Tentative Listing असलेले गुजरातमधल्या अथांग रणात एक आगळं वेगळं ठिकाण आहे – लिटिल रण ऑफ कच्छ (Little Rann of Kutch). हे क्षेत्र वाळवंट आणि खारट दलदल (Salt Marsh) यांचं अनोखं मिश्रण आहे. हा गडद गाळाचा एक विशाल, अखंड उघडा पृष्ठभाग आहे, जो क्षारांनी भरलेला आहे जो पावसाळ्यानंतर एका भव्य किनारी पाणथळ प्रदेशात रूपांतरित होतो. या विस्तीर्ण, सपाट भूभागात पाय ठेवताच एक वेगळीच दुनिया सामोरी येते. पावसाळा आला की इथं पाणी साचतं, दलदली तयार होतात, तर उन्हाळ्यात हेच विस्तीर्ण क्षेत्र पूर्ण कोरडं राहतं. हाच बदल या प्रदेशाला वैशिष्ट्यपूर्ण बनवतो. ही बदलती परिस्थिती अनेक प्रजातींना योग्य अधिवास देते. येथील अनुकूल अधिवासामुळे पक्ष्यांच्या हजारो प्रजाती, जलचर आणि स्थलचर प्राणी इथे आश्रय घेतात. हे गुजरात राज्यातील एक अनोखे आणि जैवविविधतेने समृद्ध वाळवंटी क्षेत्र आहे. संपूर्ण भारतातील सर्वात अनोख्या आणि गतिशील लँडस्केप्सपैकी एक म्हणून हे क्षेत्र ओळखलं जातं. वाळवंटासारखा सपाट भूभाग, खारट दलदल, मोसमानुसार बदलणारे अधिवास आणि अप्रतिम जैवविविधता - या सर्व निसर्गाच्या अनमोल देणग्या आहेत. येथील खारट मातीत उगवणाऱ्या विशिष्ट वनस्पती प्रजाती - स्थानिक वन्यजीवांसाठी जीवनदायी ठरतात.

येथील वातावरण अत्यंत कठीण असूनही इथे एक अत्यंत महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण वन्यजीव अभयारण्य आहे - "इंडियन वाइल्ड अॅस सँक्च्युरी" (Indian Wild Ass Sanctuary) आणि मुख्य आकर्षण म्हणजे भारतीय वन्य गाढव – एक अशी प्रजाती जी संपूर्ण जगात फक्त इथेच आढळते! संकटग्रस्त म्हणून नोंदवलेली ही प्राणीप्रजाती इथल्या रुक्ष पण अनोख्या अधिवासात सुरक्षितपणे नांदते. लिटिल रण म्हणजे केवळ एक सफर नव्हे, तर निसर्गाच्या विलक्षण सर्जनशीलतेचा साक्षात्कार आहे.  

लिटिल रणला Birders “Heaven on Earth” देखील म्हणतात. जेव्हा हिवाळ्याची चाहूल लागते, तेव्हा इथे हजारो स्थलांतरित पक्षी येतात. ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो, डॅलमेशियन पेलिकन, डेमोइसल आणि कॉमन क्रेन, अवोसट, स्टिल्ट, सॅंडग्रोझ, हारिअर्स, ईगल्स, फाल्कन्स, हिवाळ्यातील रॅप्टर डायव्हर्सिटी अप्रतिम! ही स्थलांतरितांनी सजलेली भूमी कोणत्याही पक्षीनिरीक्षकासाठी जणू एक उघडं पुस्तक असतं - प्रत्येक वळणावर नवा पक्षी, नवा अनुभव.

लिटिल रण फक्त पक्षांसाठीच नव्हे, तर विविध प्राणी आणि सरपटणाऱ्या जीवांसाठीही अत्यंत महत्त्वाचं अधिवास आहे. इंडियन वाइल्ड अॅस, नीलगाय, डेझर्ट फॉक्स, गोल्डन जॅकल, हायना, अनेक सरपटणारे जीव, वाळवंटी साप इत्यादि.

नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता :

ही भूमी केवळ सौंदर्याची नाही, तर जैवविविधतेच्या व संवर्धनाच्या दृष्टिकोनातूनही अनमोल आहे. हे एक वास्तविक नैसर्गिक रत्न आहे, जे संवर्धन आणि अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मृगजळ वाळवंटात दिसणाऱ्या मृगजळाच्या दृश्यामुळे पर्यटकही आकर्षित होतात.

लिटिल रण का विशेष ठरते त्याची अनेक करणे आहेत जसे की Asia मधील सर्वात मोठ्या खारट Desert Marshes पैकी एक, जैवविविधतेची Hotspot Zone, Raptors साठी भारतातील Top Wintering Sites, Indian Wild Ass चं प्रमुख निवासस्थान, अनोखी Geography – Salt Flats + Desert + Wetlands, पर्यावरणातील ऋतुचक्रानुसार बदलणारा अधिवास अशी अनेक करणे.

passage migration

लिटिल रण ऑफ कच्छ (Little Rann of Kutch) हा भारतातील सर्वात महत्त्वाचा Passage Migration क्षेत्रांपैकी एक मानला जातो. कारण हा भूभाग भौगोलिक, हवामानिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी अत्यंत योग्य थांबा बिंदू (stopover site) आहे.

Passage Migration म्हणजे काय? तर - काही स्थलांतरित पक्षी त्यांच्या मूळ प्रजनन स्थळांहून (जसे सायबेरिया, कझाकस्तान, मंगोलिया) दक्षिणेकडे जाताना किंवा परतताना काही विशिष्ट ठिकाणी थांबतात. हे थांबे त्यांच्यासाठी इंधनासारखे असतात—आहार, विश्रांती आणि ऊर्जा पुनर्भरण करणारे. या आंतरमार्गीय थांब्यांना Passage Migration Sites म्हणतात. Waders, Raptors, Cranes, Waterfowl (a very diverse family of birds that includes Swans, Geese and Ducks)  यांचे  Passage Migration इथे होते.

लिटिल रण ऑफ कच्छ का महत्त्वाचे?

1.    मोठा खारवट अर्ध-शुष्क प्रदेशपक्षांना व्यापक खुली जागा उपलब्ध.

2.    उथळ पाणथळ जागास्थलांतरित जलपक्ष्यांसाठी परिपूर्ण आहार स्रोत.

3.    मानवी हस्तक्षेप कमीशांत आणि सुरक्षित थांबा.

4.    वाऱ्याची दिशा हवामानप्रवासादरम्यान कमीत कमी उर्जा खर्च.

वन्यजीव सफारी :

लिटिल रण ऑफ कच्छ हे ठिकाण जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून येथे जीप सफारीद्वारे निसर्ग आणि वन्यजीव अनुभवता येतो. दसाडा हे सुरेंद्रनगर जिल्ह्यातील एक लहान गाव आहे, जे लिटिल रण ऑफ कच्छला लागून आहे. येथे जीप सफारी सर्वात लोकप्रिय आहे. दसाडा येथून सफारी सुरू केली जाते आणि यातून खडकाळ व रुक्ष भूभागात फिरता येते.

🔸 सफारी बद्दल माहिती

  • सफारी कालावधी: साधारणतः . ते . तास
  • वेळा: सकाळी (सूर्योदयाच्या वेळेस) संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळेस)
  • सफारीसाठी आगाऊ बुकिंग आवश्यक आहे, कारण जीप्सची संख्या मर्यादित आहे (विशेषतः हिवाळ्यात)
  • एंट्री पॉइंट :

-          बाजना  :  वाइल्ड अॅस सँक्च्युरी बाजनाअसे एक प्रवेशद्वार आहे जिथून तुम्ही प्रवेश करता. तिथे तुम्हास एंट्री परमीट मिळते.  

-          झिंझुवाडा : ऐतिहासिक गांव आहे, जिथून एक मोठा प्रदेश सुरू होतो तिथे जिप सफारी होते.

-          खाराघोडा : ओडूखारी, मीठाघोडा, नवा तलाव : हा एक मीठागर प्रदेश आहे जिथे पक्षीनिरीक्षण होते.

थोडक्यात, विस्तीर्ण असे रण दूरवर पसरलेले आहे. ठराविक झोनमध्ये आपण वेळेचे योग्य नियोजन करून जिप सफारी करू शकतो. सफारीसाठी परमिट केंद्रातून तिकीट काढून प्रवेश घ्यावा लागतो. कॅमेऱ्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते. वरील नुमद ठिकाणी आशियाटिक वाइल्ड अॅस (घुड़खर) मोठ्या प्रमाणावर दिसतात. सपाट भूभागात धावणाऱ्या घुड़खरांची टोळी पाहणं ही एक वेगळीच अनुभूती ठरते. त्याच सोबत Short-eared Owl, Harriers आणि Desert Fox यांच्या sightings इथे प्रसिद्ध आहेत. पाणथळ पक्ष्यांसाठी (Waders) सर्वोत्तम जागांपैकी एक. Winter मध्ये Pelicans, Ducks, Gulls यांचं मोठं attract point. इथे Raptors चे मोठ्या प्रमाणावर निरीक्षण करता येते. Flacons, especially Peregrine Falcon, Kestrel, Harriers, Eagles इत्यादी.  

  • स्थानिक मार्गदर्शक सोबत घेणे फायद्याचेते वन्यजीव पक्ष्यांबाबत सखोल माहिती देतात
  • दुर्बिण, कॅमेरा, पाणी, टोपी सनस्क्रीन सोबत ठेवावे

 🔸 इथे पोहोचण्याचे मार्ग

अहमदाबाद पासून:

  • अंतर: 130 किमी
  • रस्ता मार्गे : अहमदाबादवीरमगामदसाडा
  • रेल्वेने : अहमदाबाद ते वीरमगामतिथून टॅक्सी/बस
  • हवाई मार्ग: जवळचा विमानतळअहमदाबाद

वीरमगाम पासून:

  • अंतर: 40 किमी
  • रस्त्याने सहज पोहोचता येतेखासगी वाहन / स्थानिक बस

राजकोट / भावनगर / सुरेंद्रनगर यांपासूनही प्रवेश

  • विविध रस्ते रेल्वे मार्ग उपलब्ध

 🔸 भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी

हिवाळा – नोव्हेंबर ते फेब्रुवारी व मार्च हा कालावधी लिटल रण ऑफ कच्छला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते, आणि हवामानही सुखद असते.  निसर्ग, पक्षी, वाळवंटातील शांतता, अथांग पसरलेलं लँडस्केप—हे सगळं अनुभवायचं असेलतर Little Rann of Kutch तुमच्या ‘Must Visit’ यादीत असायलाच हवं.



2 comments:

  1. अतिशय रंजक आणि उपयुक्त माहिती आहे.
    मी नुकताच तेथे जाऊन सहा सफारी केल्या.
    वर उल्लेखिलेले बहुतेक पक्षी शिवाय जॅकल, रान मांजर, हरीण इ. प्राणी मिळाले.

    ReplyDelete
    Replies
    1. भारतातील विविध समृद्ध वनाचे एक उदाहरण... पुनः पुनः गेल्यावर अजून काही नवीन दिसूच शकते.

      Delete